राष्ट्रीय

अयोध्या ते अहमदाबाद विमानसेवा सुरू; केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी दाखवला हिरवा झेंडा

इंडिगो कंपनीच्या विमानांचे परिचालन होणार असून ११ जानेवारी २०२४ पासून प्रत्येक आठवड्यात तीन वेळा अहमदाबाद-अयोध्या-अहमदाबाद विमानसेवेला सुरुवात होईल.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी गुरुवारी नवी दिल्लीहून अयोध्या ते अहमदाबाद थेट विमानसेवेचे उद्घाटन केले. या उद्घाटनामुळे, अहमदाबादहून अयोध्येला जाण्यासाठी दर आठवड्याला तीन थेट विमान फेऱ्या उपलब्ध होतील.

या मार्गावर इंडिगो कंपनीच्या विमानांचे परिचालन होणार असून ११ जानेवारी २०२४ पासून प्रत्येक आठवड्यात तीन वेळा अहमदाबाद-अयोध्या-अहमदाबाद विमानसेवेला सुरुवात होईल. उद्घाटनपर भाषणात केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले, “अयोध्या ते अहमदाबाद थेट विमानसेवेमुळे या दोन्ही शहरांदरम्यान हवाई संपर्काला चालना मिळेल.” ही दोन शहरे खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करतात असे देखील केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एकीकडे अहमदाबाद हे शहर भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक आहे तर दुसरीकडे, अयोध्या शहर भारताच्या अध्यात्मिक आणि नागरी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. या दोन शहरांच्या दरम्यान सुरू होणारा थेट हवाई संपर्क या शहरांच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देईल, तसेच प्रवास आणि पर्यटन यांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त ठरेल.

आजचे विमानतळ हे विमानतळ ही जागा म्हणजे केवळ विमानांच्या अवागमनाचे स्थान नसून ते त्या त्या भागाची वैशिष्ट्ये, संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडवणारा मार्ग देखील असला पाहिजे या पंतप्रधानांनी मांडलेल्या कल्पनेची पूर्तता करणारे आहेत याचा देखील पुनरुच्चार केंद्रीय मंत्र्यांनी केला. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ इमारतीची बाह्यरचना राम मंदिरापासून प्रेरणा घेऊन उभारली असून, टर्मिनल इमारतीमध्ये लावलेली सुंदर चित्रे आणि शिल्पकृती यांतून भगवान रामाच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडते. पुढच्या महिन्यापर्यंत, उत्तर प्रदेशात आझमगड, अलिगढ, मुरादाबाद, श्रावस्ती आणि चित्रकुट अशा पाच ठिकाणच्या विमानतळांचे कार्य सुरू होईल. याखेरीज, २०२४ च्या अखेरपर्यंत जेवार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील परिचालनासाठी सज्ज असेल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प