राष्ट्रीय

संधी मिळाल्यास संविधानाचे रक्षण करणार - बी. सुदर्शन रेड्डी; सर्व खासदारांना पत्र लिहिणार

आपल्याला उपराष्ट्रपती म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यास, आपण संविधानाचे रक्षण करणार, उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी सांगितले. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही आणि सामील होण्याचा माझा हेतू नाही.

Swapnil S

मुंबई : आपल्याला उपराष्ट्रपती म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यास, आपण संविधानाचे रक्षण करणार, उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी सांगितले. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही आणि सामील होण्याचा माझा हेतू नाही. कदाचित म्हणूनच सर्व विरोधी पक्षांनी मला उमेदवार म्हणून निवडले आहे, असे रेड्डी म्हणाले.

उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितले की, ते लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांना पत्र लिहून त्यांच्या उमेदवारीचा विचार करण्याचे आवाहन करणार आहेत.

याआधी दिवसभरात रेड्डी यांनी मतांसाठी प्रचार करताना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. रेड्डींनी मात्र या लढतीला 'दक्षिण विरुद्ध दक्षिण' असे स्वरूप दिले जात असल्याच्या सूचनांना फेटाळले. "ही लढाई दोन व्यक्तींमधील आहे. देश एक आहे, राष्ट्र एक आहे," असे ते म्हणाले.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती