आता 'बद्रीनाथ'मध्येही चौकशीचे आदेश; देणग्यांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप, मंदिर समितीकडून स्वतःहून दखल 
राष्ट्रीय

आता 'बद्रीनाथ'मध्येही चौकशीचे आदेश; देणग्यांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप, मंदिर समितीकडून स्वतःहून दखल

अयोध्या येथील राम मंदिरातील देणग्यांच्या अपहारामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आता श्री बद्रीनाथ धाम येथे अर्पण करण्यात आलेल्या देणग्यांमध्येही अशाच स्वरूपाचे गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

Swapnil S

चमोली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणग्यांच्या अपहारामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आता श्री बद्रीनाथ धाम येथे अर्पण करण्यात आलेल्या देणग्यांमध्येही अशाच स्वरूपाचे गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या आरोपांची मंदिर समितीने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या आरोपांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

तो 'वैयक्तिक सचिव' नाही

या कथित गैरव्यवहारात नाव आलेल्या एका कर्मचाऱ्याला सोशल मीडियावर हेमंत द्विवेदी यांचा 'वैयक्तिक सचिव' म्हटले जात आहे. मात्र, द्विवेदी यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आता मेसेज शेड्युल करता येणार; 'व्ह्यू वन्स' टेक्स्टचाही पर्याय, जाणून घ्या नवे फीचर्स

Pune : शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा एकावर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; सपासप वार करून हल्लेखोर फरार

पाणी कपातीतून आठवड्याचा दिलासा! एमआयडीसीचा २७ नोव्हेंबरचे नियोजित शटडाऊन रद्द

Naigaon : आईच्या निधनाचं दुःख ताजं असतानाच आणखी एक आघात; खेळताना ११ व्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! लेकीच्या लग्नाआधीच वडिलांचा मृत्यू; भावांनी केली बहिणीची पाठवणी