राष्ट्रीय

Odisha Train Tragedy : भाड्याच्या घरात राहणारा हा अभियंता सीबीआयच्या तपासानंतर कुटुंबासह बेपत्ता ; बालासोर रेल्वे अपघात सीबीआयची मोठी कारवाई

सोमवारी सीबीआयचे पथक पुन्हा आल्यानंतर अभियंता त्याच्या घरी सापडला नाही. सीबीआयने अभियंत्याचे घर सील केले आहे.

नवशक्ती Web Desk

ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडाची चर्चा सुरू असताना सोमवारी (19 जून) सीबीआयने रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल कनिष्ठ अभियंता यांचे घर सील केले आहे. बालासोर येथे भाड्याच्या घरात राहणारा हा अभियंता सीबीआयच्या तपासानंतर कुटुंबासह बेपत्ता आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासात या कनिष्ठ अभियंत्याची चौकशी करण्यात आली. सोमवारी सीबीआयचे पथक पुन्हा आल्यानंतर अभियंता त्याच्या घरी सापडला नाही. सीबीआयने अभियंत्याचे घर सील केले आहे.

दरम्यान, ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता २९२ वर पोहोचली आहे. पश्चिम बंगालमधील २४ वर्षीय गंभीर जखमी प्रवाशाचा रविवारी (१९ जून) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात 287 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पाच प्रवासी गंभीर जखमी होऊन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १२०८ प्रवासी जखमी झाले आहेत.

बालासोर रेल्वे अपघात प्रकरणाचा तपास सीबीआयने ६ जून रोजी हाती घेतला. याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर सिग्नल यंत्रणेत छेडछाड केल्याच्या आरोपानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर रेल्वे स्टेशनही सील करण्यात आले. सिग्नल यंत्रणेशी संबंधित इंटरलॉकिंग पॅनलही सील करण्यात आले. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत बहंगा बाजार रेल्वे स्थानकावर कोणतीही गाडी थांबवली जाणार नाही.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत