‘झुरळां’च्या ‘एक्स’ खात्यावरील बंदी कायम 
राष्ट्रीय

‘झुरळां’च्या ‘एक्स’ खात्यावरील बंदी कायम

कॉकरोच जनता पार्टीचे ‘एक्स’वरील खाते बंद करण्याला अंतिरम स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Swapnil S

दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे ‘एक्स’वरील खाते बंद करण्याला अंतिरम स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेनं दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकार आणि एक्सला (पूर्वीचे ट्विटर) नोटीस बजावली आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी सरकारची बाजू ऐकणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणाचे दूरगामी परिणाम आणि दूरगामी प्रभाव असल्याने, सरकारची बाजू ऐकल्याशिवाय असा आदेश दिला जाऊ शकत नाही. न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी ६ जुलै रोजी निश्चित केली. सरन्यायाधीश सूर्यकांत बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केल्याचे प्रसिध्द झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या कथित टिप्पणीनंतर कॉकरोच जनता पार्टी हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उदयास आले. शुक्रवार दुपारी ३ वाजेपर्यंत सीजेपीचे इन्स्टाग्रामवर सव्वादोन कोटी फॉलोअर्स होते.

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा

UPI Payment Failed : खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट फेल? बँकेकडून मिळू शकते रोज १०० रुपयांची नुकसानभरपाई; जाणून घ्या नियम

Thane : भाजप-शिंदे सेनेत 'टोळीयुद्ध'; सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक, हर्षवर्धन सपकाळ यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद