राष्ट्रीय

मुर्शिदाबाद हिंसाचार पीडितांची राज्यपाल बोस यांनी केली विचारपूस

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारामुळे शेकडो महिलांना फटका बसला आहे.

Swapnil S

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारामुळे शेकडो महिलांना फटका बसला आहे. या हिंसाचारात सर्वस्व गमावून बसलेल्या नागरिकांची पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी विचारपूस केली.

ते म्हणाले की, हिंसेचा मार्ग निवडणारी मानसिकता मुळापासून काढून टाकणे गरजेचे आहे. पश्चिम बंगालमध्ये शांतता व सौहार्द कायम ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. त्यातूनच हिंसाचार कमी होऊ शकेल.

मुर्शिदाबाद आणि मालदासारखा हिंसाचार होऊ नये. बंगालच्या रस्त्यावर मृत्यूचे तांडव सुरू आहे. हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही. हिंसेविरोधात लढाई लढणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी पाऊल पडते पुढे

जुलै महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'