राष्ट्रीय

मिझोराममध्ये मोठी दुर्घटना ! बांधकाम सुरु असतानाच कोसळला पुल ; 17 जणांचा मृत्यू

मिझोरामची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला

नवशक्ती Web Desk

मिझोराममध्ये बुधवार (२३ ऑगस्ट) रोजी एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकार्‍यांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिझोरामची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार असं समजतंय की, ही दुर्घटना घडली त्यावेळी बांधकाम सुरु असलेल्या पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंगला जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. या पुलदुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं.

तिसऱ्या व चौथ्या खांबामधील गर्डर 341 फूट खोल पडला होता. पुलामध्ये एकूण 4 खांब असून त्यापैकी तिसऱ्या व चौथ्या खांबामधला गर्डर खाली पडल्यामुळे हा भीषण अपघात घडला. या गर्डरनर हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची तब्बल 104 मीटर म्हणजेच 341 फूट एवढी आहे. म्हणजेच पुलाची उंची कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असला तरी अजूनही काही कामगारा दबले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

राज्यात ८१ हजार कोटींची गुंतवणूक; ४० हजार रोजगारनिर्मिती होणार; ‘ग्रीन स्टील’ क्षेत्रात महाराष्ट्र ‘नंबर वन’ होणार - फडणवीस

नाशिक जिल्हा न्यायालयाची अत्याधुनिक नवीन इमारत; २७ सप्टेंबरला होणार उद्घाटन ; CJI भूषण गवई व मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

बेताल वक्तव्यावरून वाद; पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप

महाराष्ट्रातील ४४ पक्षांसह देशातील ४७४ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई