राष्ट्रीय

बिग बॉस फेम अर्चना गौतमच्या वडिलांचे प्रियंका गांधींच्या पीएवर केले 'हे' आरोप; गुन्हा दाखल

बिग बॉस फेम अर्चना गौतमच्या वडिलांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांचे पीए संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी

बिग बॉस फेम अर्चना गौतमच्या वडिलांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे स्वीय्य सहाय्यक संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिच्या वडिलांनी आरोप केले आहेत की, संदीप सिंह यांनी अर्चनासोबत बोलताना काही जातीवाचक शब्दांचा वापर केला. तसेच, तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. अशी आरोप त्यांनी केला आहे.

अर्चना गौतमने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करुन संदीप सिंह यांनी तिच्यासोबत केलेल्या वागणुकीची माहिती दिली होती.

या घटनेनंतर आता अर्चनाच्या वडिलांनी संदीप सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मेरठ पोलिसांनी संदीप सिंह विरुद्ध कलम ५०४, ५०६ आणि एससी, एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याची माहिती दिली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये प्रियंका गांधींचे पीए संदीप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ती म्हणाले होती की, संदीप सिंह यांची वागणूक चांगली नसून ते महिलांसोबत किंवा ज्येष्ठ व्यक्तींसोबत व्यवस्थित बोलत नाहीत. ही सर्वच काँग्रेस पक्षातील लोकांची तक्रार आहे. दरम्यान, २६ फेब्रुवारीला अर्चनाने रायपूरमध्ये प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिने फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला होता.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

भारत-चीन हे विकासाचे भागीदार; पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची ठाम भूमिका

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर