Photo : ANI
राष्ट्रीय

'ब्रह्मोस'चा हल्ला, तर 'आकाशतीर'चे संरक्षण; DRDO च्या समीर कामत यांची माहिती

'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारताच्या अत्याधुनिक 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राने हल्ला केला, तर 'आकाशतीर' संरक्षण प्रणालीने ड्रोन उद्ध्वस्त केले, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारताच्या अत्याधुनिक 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राने हल्ला केला, तर 'आकाशतीर' संरक्षण प्रणालीने ड्रोन उद्ध्वस्त केले, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांनी दिली.

संरक्षण आधुनिक तंत्रज्ञान संस्थेच्या १४ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. भारताच्या पश्चिम सीमेवर अत्यंत समन्वित व बहुआयामी 'ऑपरेशन सिंदूर' ने केवळ सैनिकांचे साहस दर्शवले नाही तर त्यांची तंत्रज्ञान क्षमता दाखवून दिली.

कामत म्हणाले की, हल्ला करण्यासाठी मुख्य शस्त्र म्हणून 'ब्रह्मोस' वापरले. हे क्षेपणास्त्र सुखोई मार्क-१ मधून डागण्यात आले, तर 'आकाशतीर' प्रणालीने संरक्षणाचे काम केले. या स्वदेशी ड्रोनविरोधी प्रणालीने सीमेवर येणाऱ्या धोक्यांची ओळख पटवून त्यांना नष्ट करण्यासाठी योग्य शस्त्र निवडण्यात योगदान दिले. सर्व सेन्सर्सना 'आकाशतीर' नेटवर्कशी जोडण्यात आले. त्यामुळे येऊ घातलेल्या धोक्यांची ओळख तत्काळ पटवून योग्य शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली. आगाऊ सूचना देणाऱ्या व नियंत्रण करणाऱ्या विमानांचा वापर टेहळणीसाठी करण्यात आला. भारताच्या संरक्षण संशोधन व उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या ताकदीचा आम्हाला अभिमान आहे, असे डीआरडीओचे प्रमुख म्हणाले.

आकाशतीर प्रणाली म्हणजे काय ?

'आकाशतीर' ही संपूर्ण स्वदेशी व स्वयंचलित हवाई संरक्षण प्रणाली आहे. तिने भारत-पाक संघर्षाच्या काळात प्रत्येक क्षेपणास्त्राला रोखून नष्ट केले.

निवडणूक आयोगाला जाब द्यावाच लागेल!

राजकीय स्वार्थापोटी आयोगावर चिखलफेक

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव