राष्ट्रीय

सीबीआयकडून मोठ्या बँक घोटाळ्याचा तपास सुरु,कपिल वाधवान अटकेत

वृत्तसंस्था

सीबीआयने दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे माजी सीएमडी कपिल वाधवान, संचालक धीरज वाधवान आणि अन्य यांना ३४,६१५ कोटी रुपयांच्या नव्या प्रकरणात अटक केली आहे. सीबीआयकडून मोठ्या बँक घोटाळ्याचा तपास करत आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयच्या ५० हून अधिकाऱ्यांनी मुंबईत १२ ठिकाणी छापे घातले. एफआयआरमधील आमरीलीज रिॲल्टर्सचे सुधाकर शेट्टी आणि अन्य आठ बिल्डर्सविरोधात आरोपी करण्यात आल्याने त्यांच्या घरांवर आणि कार्यलयांवर छापे टाकले आहेत.

कंपनीने आरोप केला आहे की, या कंपनीने ४२,८७१ कोटी रुपयांची कर्जसुविधा २०१० ते २०१८ दरम्यान, बँकांकडून घेतले होते. तथापि, मे २०१९ पासून त्यांनी कर्जाची परतफेड न करता थकित ठेवले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे कर्जखाते एनपीए करण्यात आले आहे.

राजस्थान आणि मुंबईत छाप्यात बेहिशेबी उत्पन्न आढळले

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने नुकतेच काही सराफा व्यापाऱ्यांसह हस्तकला उत्पादनांची किरकोळ विक्री आणि निर्यात करणाऱ्या, रोखीने वित्तपुरवठा करणाऱ्या, जमीन आणि इमारतींची खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिक समूहावर छापे टाकत जप्तीची कारवाई केली. राजस्थान आणि मुंबईतील २५ हून अधिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. त्यात १०० कोटींहून बेहिशेबी उत्पन्न आढळून आले आहे.

छापासत्रादरम्यान, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत असून ती जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले पुरावे लक्षपूर्वक तपासले असता असे दिसून आले की,या समूहाने बांधकाम व्यवसायात बेहिशेबी रोख व्यवहार केले असून बोगस खरेदी देयके मिळवली आहेत. सराफा व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या सोन्या-चांदीच्या बनावट देयकांच्या माध्यमातून हिशेबाच्या खाते वह्यांमध्ये खरेदी फुगवून दाखवत हस्तकला उत्पादन व्यवसायातील नफा दडपण्याची या समूहाची कार्यपद्धती आहे. सराफा व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या धनादेशापोटी रोख रक्कम परत मिळाल्याचेही या छाप्यादरम्यान दिसून आले आहे.

रोख रकमेचा वापर बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी तसेच तसेच धनादेश मिळवण्यासाठी खाते पुस्तकांमध्ये जमा म्हणून सादर करण्यात येत होता, हे आढळून आले. जप्त केलेल्या पुराव्यांवरून असेही समोर आले आहे की, या समूहाने अलीकडेच काही बनावट कंपन्या एन्ट्री ऑपरेटर्सच्या माध्यमातून विकत घेतल्या आहेत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस