राष्ट्रीय

पराळी जाळल्यास दुप्पट दंड; केंद्र सरकारचा आदेश

दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

सरकारच्या अधिसूचनेनुसार, दोन एकरपेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना २५०० ऐवजी ५ हजार रुपये दंड, २ ते ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ ऐवजी १० हजार रुपये दंड भरावा लागेल.

वाहनांचे प्रदूषण, पराळी जाळणे, फटाके वाजवणे व स्थानिक प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवा प्रदूषित झाली आहे. शेतकऱ्यांनी पराळी जाळल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदूषणात वाढ झालेली दिसत आहे, असे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सांगितले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री