Karnataka : ‘हेट स्पीच’ कायद्याला केंद्राचा लाल कंदील 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

Karnataka : ‘हेट स्पीच’ कायद्याला केंद्राचा लाल कंदील

कर्नाटक सरकारने द्वेषयुक्त भाषणांना आळा घालण्यासाठी आणलेला नवा कायदा सध्याच्या टप्प्यावर आवश्यक नाही, असे मत केंद्रीय गृह मंत्रालयाने व्यक्त केले आहे.

Swapnil S

बंगळुरू : कर्नाटक सरकारने द्वेषयुक्त भाषणांना आळा घालण्यासाठी आणलेला नवा कायदा सध्याच्या टप्प्यावर आवश्यक नाही, असे मत केंद्रीय गृह मंत्रालयाने व्यक्त केले आहे. या समस्येचा निपटारा करण्यासाठी देशातील सध्याची कायदेशीर चौकट पूर्णपणे पुरेशी असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'केंद्र-राज्य विभागाने' 'कर्नाटक द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषयुक्त गुन्हे (प्रतिबंधक) विधेयक, २०२५'बाबतची केंद्राची भूमिका कर्नाटक सरकारला कळवली आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या विधेयकाला मंजुरी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर, राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले होते. गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी बेळगावी येथील हिवाळी अधिवेशनात भाजप आणि जेडीएस या विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधानंतरही हे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या केंद्र-राज्य विभागाने १२ मे रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, या प्रकरणाची सखोल पडताळणी करण्यात आली आहे. या विधेयकाद्वारे ज्या मुद्द्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे, ते मुद्दे आधीच 'भारतीय न्याय संहिता २०२३' आणि इतर प्रचलित कायद्यांमधील तरतुदींनुसार मोठ्या प्रमाणावर कव्हर करण्यात आले आहेत. राज्याने यासाठी वेगळा कायदा केल्यास कायद्यांची द्विरुक्ती होईल आणि देशभरातील कायद्यांमधील एकसमानता धोक्यात येईल. हे लक्षात घेता, प्रस्तावित कायदा सध्याच्या टप्प्यावर आवश्यक वाटत नाही आणि सध्याची कायदेशीर चौकट या चिंतेचे निवारण करण्यासाठी पुरेशी आहे, असेही मंत्रालयाने पुढे स्पष्ट केले.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."

Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी

'पुन्हा एकत्र राहू' म्हणत बोलावलं; काही वेळातच घटस्फोटित पत्नीची हत्या, घटनेआधीची Reel व्हायरल

Bhiwandi Building Collapse : धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करा; महापौरांचे आदेश