X
राष्ट्रीय

Gonda Train Accident: युपीमध्ये मोठा रेल्वे अपघात; चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरुन घसरले

Chandigarh-Dibrugarh Express Accident: उत्तर प्रदेशातील गोंडा-गोरखपूर रेल्वे मार्गावरील मोतीगंजमधील पिकौरा गावाजवळ गुरुवारी चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या किमान १० डब्बे रुळावरुन घसरले , त्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tejashree Gaikwad

Gonda Train Accident Videoप्राथमिक वृत्तानुसार, दुपारी २.३५ च्या सुमारास हा अपघात झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "चंडीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ दुपारी २.३५ च्या सुमारास रुळावरून घसरली." असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर राबवावे आणि जखमींना प्राधान्याने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी याबद्दल एक्स (आधीचे ट्विटर) वर पोस्ट करत गोंडा जिल्ह्यात झालेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही भगवान श्री रामाला प्रार्थना करतो." असेही म्हटले आहे.

मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, अपघातामागील कारण अद्याप समजू शकले नाही. या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे की नाही हे देखील अद्याप समजू शकलेले नाही. तरी काही टीव्ही माध्यमांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

आता मेट्रो गर्दीचे आव्हान