राष्ट्रीय

चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; मोदींनी मिठी मारून केले अभिनंदन

तेलुगु देसम पक्षाचे सुप्रीमो नारा चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी, १२ जून रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली.

Swapnil S

तेलुगु देसम पक्षाचे सुप्रीमो नारा चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी, १२ जून रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्रचे राज्यपाल एस अब्दुल नजीर, तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदराजन या शपथविधीला उपस्थित होते.

पवन कल्याण उपमुख्यमंत्री

चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडाच्या बाहेरील केसरपल्ली येथील गन्नावरम विमानतळाजवळ सकाळी ११:२७ च्या सुमारास शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांच्यासह जनसेना प्रमुख पवन कल्याण, नायडूंचे पुत्र आणि टीडीपीचे सरचिटणीस मुलगा नारा लोकेश आणि इतर २२ जणांनीही शपथ घेतली. पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. जनसेनेला तीन आणि भारतीय जनता पक्षाला एक मंत्रिमंडळ देऊ केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि इतर अनेक नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नायडू मंचावर उपस्थित पंतप्रधान मोदींकडे वळले. मोदींनी आधी पुष्पगुच्छ देऊन नायडूंचे अभिनंदन केले. त्यानंतर दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, अभिनेते चिरंजीवी, रजनीकांत, नंदामुरी बालकृष्ण हेही यावेळी उपस्थित होते.

मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह २६ मंत्री?

नायडू यांच्या नेतृत्वाखाली TDP-भाजप-जनसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. आंध्र प्रदेशच्या १७५ सदस्यीय विधानसभेत १३५ आमदारांसह टीडीपीकडे बहुमत आहे, तर त्याचा मित्रपक्ष जनसेना पक्षाकडे २१ आणि भाजपकडे ८ आमदार आहेत. विरोधी वायएसआर काँग्रेस पक्षाकडे ११ आमदार आहेत. १७५ सदस्यीय आंध्र प्रदेश विधानसभेत मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह २६ मंत्री असू शकतात. अमरावती हे शहर आंध्र प्रदेशची राजधानी राहील, अशी घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वीच केली आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत