PTI
राष्ट्रीय

रेवण्णा पिता-पुत्राविरुद्ध आरोपपत्र दाखल

सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपीखाली, तर त्याचे वडील आमदार एच. डी. रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली शनिवारी आरोपपत्र दाखल केले आहे.

Swapnil S

बंगळुरू : सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपीखाली, तर त्याचे वडील आमदार एच. डी. रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली शनिवारी आरोपपत्र दाखल केले आहे.

प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्धच्या चार प्रकरणांचा तपास एसआयटी करीत असून दोन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये जवळपास १५० साक्षीदारांचे जबाब आहेत.

लोकप्रतिनिधींसाठीच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

रेवण्णा पिता-पुत्राविरुद्ध पहिली तक्रार त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता, असे एसआयटीने म्हटले आहे.

प्रचारसभांत राज-उद्धव यांचे परस्परविरोधी व्हिडीओ? भाजपची मुंबई निवडणुकीसाठी रणनीती

Mumbai : मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉकच प्रवाशांना टॅक्सी, रिक्षाचा आधार

मुलांच्या इंटरनेट वापराच्या निर्बंधासाठी कायदा करा! मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाचे केंद्राला निर्देश

मध्यस्थी ही कायद्याची सर्वोच्च उत्क्रांती! सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन

कबुतरांना खाद्य घालणाऱ्या व्यावसायिकाला ५ हजारांचा दंड; माहीममध्ये घडली होती घटना