प्रातिनिधिक छायाचित्र 
राष्ट्रीय

छत्तीसगडमधील चकमकीत दोन महिलांसह ३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर एकूण १५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

Swapnil S

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर एकूण १५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

जिल्हा राखीव दलाच्या तुकडीने नक्षलवादविरोधी मोहीम हाती घेतली होती, तेव्हा तुमलपाड गावातील डोंगराळ प्रदेशात ही चकमक उडाली. दीर्घकाळ चाललेल्या या चकमकीनंतर सुरक्षा दलांना घटनास्थळी तीन मृतदेह आढळले. त्यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी ए.३०३ रायफल, बॅरल ग्रेनेड लॉन्चर्स अन्य शस्त्र आणि स्फोटके जप्त केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे मडवी देवा, पोडियम गंगी आणि सोधी गंगी अशी आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

बस्तर परिमंडळात यंदा आतापर्यंत २३३ नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न