कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत 
राष्ट्रीय

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत

नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील कथित अनियमिततेविरोधात CJP कडून देशभरात आंदोलन सुरू आहे.

किशोरी घायवट-उबाळे

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटीविरोधी आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर अभिजीत दिपके यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील कथित अनियमिततेविरोधात CJP कडून देशभरात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन पुण्यातून सुरू होऊन १५ जून रोजी जयपूरमध्ये पोहोचले होते. शहीद स्मारक येथे आयोजित आंदोलनात अभिजीत दिपके उपस्थितांना संबोधित करणार होते, त्याआधीच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिजीत दिपके समर्थकांच्या खांद्यावर बसवून घेऊन जात असताना काही जण त्यांच्याजवळ येऊन हात उचलताना दिसत आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

घटनेनंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहे. आम्ही आमचा आवाज शांततेने उठवत राहू. मी गांधी आणि आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि शांतता व प्रेमाच्या मार्गाने हा लढा सुरू ठेवत राहीन. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा!" अशी पोस्ट त्यांनी केली असून ती सध्या चर्चेत आहे.

देशभरातील आंदोलनाचा भाग

CJP कडून NEET पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील कथित अनियमिततेविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि लखनऊपर्यंत पोहोचले आहे.

मारहाण करणारा पोलिसांच्या ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

­­‘ऑल आऊट ५०००’ फटाक्याचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद, फटाक्यांची चाचणी, ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी

तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर सिडकोला सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन

Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीला पार्किंगचे ग्रहण; ग्राहक हैराण, बाजारपेठांत तुफान गर्दी

Thane : दिवाळीच्या शुभेच्छापत्रासोबत गोमातेसाठी ११ किलो चारा! QR कोडद्वारे चारा वितरणाची माहिती आणि छायाचित्रे मिळणार