@mieknathshinde
@mieknathshinde
राष्ट्रीय

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले अयोध्येत श्रीरामाचे दर्शन; म्हणाले, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद

प्रतिनिधी

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांचे शनिवारी अयोध्येत ढोलताश्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खासदार अयोध्येमध्ये गेले आहेत.

अशामध्ये आज मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच, त्यानंतर दोघांनीही हनुमान गढीचेही दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्वपन पूर्ण होत असल्याचा आनंद आहे,' अशा भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "श्री राम प्रभूचे दर्शन घेतल्याचा मोठा आनंद आहे. इथून ही ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ आणि महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल? यासाठी प्रयत्न करु. बळीराजावरचे संकट दूर व्हावे आणि राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस यावेत हीच मागणी श्रीरामाच्या चरणी केली आहे." अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया