राष्ट्रीय

५जी लिलावासाठी अंबानी आणि अदानी यांच्यात प्रथमच स्पर्धा,नउद्योगपतींमध्ये थेट बाजार युद्ध नाही

वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षांपासून संपत्तीवरुन क्रमवारीत मागे-पुढे असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात आता या महिन्यात होणाऱ्या ५जी दूरसंचार सेवा लिलावावरुन प्रथमच स्पर्धा होण्याची शक्यता आहे. तथापि, राजकीय नेत्यांशी उत्तम संबंध असलेल्या उभय गुजराती उद्योगपतींमध्ये थेट बाजार युद्ध होणार नाही.

दरम्यान, शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाने ५जी स्पेक्ट्रममधील सहभागाची पुष्टी केली. कंपनीचे म्हणणे आहे की, ते विमानतळांपासून ते उर्जेपर्यंतच्या व्यवसायाला मदत करण्यासाठी खाजगी नेटवर्क तयार करण्यासाठी त्याचा वापर करेल.

५जी स्पेक्ट्रमचा लिलाव २६ जुलैपासून होणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जुलै होती. सरकार २० जुलैपासून होणाऱ्या लिलावात सहभागी होणाऱ्यांची यादी जाहीर करील.

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओ आणि सुनील भारतीच्या एअरटेलला लिलावात सहभागी होणाऱ्या अदानी समुहासोबत कडवी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रातील जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन मोठ्या खाजगी कंपन्या आहेत. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, मार्च २०२३ पर्यंत देशात ५जी सेवा उपलब्ध होईल आणि ती ४जी पेक्षा १० पट वेगवान असेल. २० वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ७२,०९७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल, असेही ते म्हणाले होते.

लिलावाच्या अंतिम मुदतीनुसार, अर्जदारांच्या मालकीचे तपशील १२ जुलै रोजी प्रकाशित केले जाणार आहेत. २६ जुलै २०२२ पासून सुरू होणाऱ्या लिलावादरम्यान एकूण ७२,०९७.८५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचे किमान ४.३ लाख कोटी रुपये ब्लॉक केले जातील.

स्पेक्ट्रमसाठी लिलाव विविध निम्न (६०० मेगाहर्टझ‌, ७०० मेगाहर्टझ, ८०० मेगाहर्टझ, ९०० मेगाहर्टझ, १८०० मेगाहर्टझ, २१०० मेगाहर्टझ, २३०० मेगाहर्टझ), मध्य (३३०० मेगाहर्टझ) आणि उच्च (२६ गिगाहर्टझ) प्रकारांमधील बँडमध्ये आयोजित केला जाईल.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण