PTI
राष्ट्रीय

काँग्रेस-आप चर्चा निष्फळ; हरयाणा विधानसभा निवडणूक, आपचे २० उमेदवार जाहीर

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपने सोमवारी आपल्या २० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करून काँग्रेससमवेत आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपने सोमवारी आपल्या २० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करून काँग्रेससमवेत आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. हरयाणा विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

पहिल्या दिवसापासूनच आम्ही ९० जागा स्वबळावर लढण्याची तयारी करीत होतो, निवडणुकीसाठी आता जास्त कालावधी राहिलेला नाही. १२ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा संपली आहे, असे हरयाणा आपचे अध्यक्ष सुशील गुप्ता यांनी सांगितले.

हरयाणामध्ये आप हा समर्थ पर्याय आहे. पक्षाची दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल. हरयाणा निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढल्या जातील, असे पक्षाने म्हटले आहे. हरयाणामध्ये आपने किती जागा लढवायच्या यावर काँग्रेसशी सुरू असलेली चर्चा थांबली. आपने १० जागांची मागणी केली होती तर काँग्रेसने पाच जागा देण्याचा प्रस्ताव आपसमोर ठेवला होता.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन