राष्ट्रीय

काँग्रेसची वर्किंग कमिटी जाहीर , महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा समावेश

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही कमिटी जाहीर केली असून ३९ नेत्यांच्या नावांचा या कमिटीत समावेश केला आहे.

नवशक्ती Web Desk

काँग्रेसची वर्किग कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही कमिटी जाहीर केली आहे. नाराज असलेसे राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचा देखीस या कमिटीत समावेश करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील नेत्यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील या कमिटीत समावेश आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं असून यादी देखील जाहीर केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी २० ऑगस्ट रोजी प्रेस नोट रिलीझ केली असून यात काँग्रेसच्या वर्किंग मिटीतील नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. यात काँग्रेस नेते सचिन पायलट, शशी थरुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, पी चिदंबरण, अशोक चव्हाण, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, अल्का लांबा, यशोमती ठाकूर, पवन खेरा, प्रणिती शिंदे, पवन खेरा, गणेश गडियाल, रणदिप सिंग सुरजेवाला, तारिक अनवर, के सी वेणूगोपाल, गौरव गौगाई यांच्यासह ३९ नावांचा समावेश करण्यात आला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश