राष्ट्रीय

लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतर पोलीस बनला पिता

Swapnil S

मुंबई : ललिता ते ललित आणि आता पिता होणे, हा महाराष्ट्रातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा एक उल्लेखनीय प्रवास आहे. कॉन्स्टेबल ललित कुमार साळवे याने पुरुष होण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती आणि २०२० मध्ये लग्न केले होते. आता त्यांना १५ जानेवारी रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी असलेले साळवे कुटुंब नव्या सदस्याची भर पडल्याने आनंदी आहे, पण त्यांचा एक स्त्री ते पुरुष हा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. जून १९८८ मध्ये ललिता साळवे म्हणून त्यांचा जन्म झाला. २०१० मध्ये त्या महिला म्हणून पोलीस दलात रूजू झाल्या. परंतु २०१३ मध्ये पोलिसांना शरीरातील बदल लक्षात येऊ लागले आणि वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यात ज्याने वाय गुणसूत्राच्या उपस्थितीची पुष्टी केली. पुरुषांमध्ये एक्स आणि वाय लैंगिक गुणसूत्र असतात, तर स्त्रियांमध्ये दोन एक्स गुणसूत्र असतात. साळवे यांना जेंडर डिसफोरिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते आणि त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

२०१८ मध्ये राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर कॉन्स्टेबलने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली. त्याला २०१८ ते २०२० दरम्यान तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. २०२० मध्ये साळवे यांचा छत्रपती संभाजीनगर येथील सीमा नावाच्या महिलेशी विवाह झाला. पत्रकारांशी बोलताना साळवे म्हणाले की, स्त्री ते पुरुष हा माझा प्रवास संघर्षाने भरलेला होता. या काळात मला अनेकांनी साथ दिली. त्यांचा मला आशीर्वाद मिळाला. माझी पत्नी सीमा यांना मूल व्हावे अशी इच्छा होती आणि आता मी बाप झालो याचा मला आनंद आहे. माझे कुटुंब रोमांचित आहे, असेही त्यांनी सांगितले.

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलावर कारवाई होणार का? पुणे अपघातावर काय म्हणाले फडणवीस?

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण