संग्रहित छायाचित्र एएनआय
राष्ट्रीय

देशात कोरोनाचे रुग्ण वाढले; सक्रिय रुग्णांची संख्या ३३९५

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोविड-१९ रुग्णांच्या संख्येने ३००० संख्या ओलांडली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३३६ जण बाधित आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोविड-१९ रुग्णांच्या संख्येने ३००० संख्या ओलांडली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १३३६ जण बाधित आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि दिल्ली यांचा क्रमांक आहे. देशात ३३९५ सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासांत दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. देशातील कोविड-१९ स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशात २२ मे रोजी २५७ सक्रिय रुग्ण होते, २६ मे रोजी ही संख्या १०१०१ इतकी झाली, तर शनिवारी ती संख्या ३३९५ वर पोहोचली. गेल्या २४ तासांत ६८५ नवे रुग्ण आढळले आणि चार जणांचा मृत्यू झाला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video