राष्ट्रीय

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधकांचे टीकास्त्र

राहुल गांधी यांनी दोन ओळींचे ट्विट करत या कार्यक्रमावर टीका केली आहे.

नवशक्ती Web Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पार पडले. हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. नव्या संसदेचे उद्घाटन पार पडताच विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी फक्त दोन ओळींचे ट्विट करत मोदींवर टीका केली आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना डावलण्यात आले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या हस्ते हे उद्घाटन व्हायला हवे होते. राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती यांची मिळून संसद तयार होते. या कार्यक्रमाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना आमंत्रण देण्यात आले नाही. असा आरोप करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर असल्याचे म्हणत विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जाहीर करुन या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यावरुन सत्ताधारी पक्षाने देखील बहिष्कार घालणाऱ्या पक्षांवर टीका केली होती. आता राहुल गांधी यांनी दोन ओळींचे ट्विट करत या कार्यक्रमावर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी "संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसदेच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत", असे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. तसेच संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्षातील अनेकांना आमंत्रण देण्यात आले नव्हते, असा दावा देखील विरोधी पक्षाच्या खासदारांकडून करण्यात आला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशाचे राजकारण चांगलेच तापले होते.

पवारांनी देखील केली टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पंडीत नेहरुंच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात चालल्याची भूमिका मांडली. या विषयी बोलताना पवार म्हणाले की, "जवाहरलाल नेहरुंनी आधुनिक भारताची संकल्पना मांडली. पण आपण पुन्हा देशाला काही वर्ष मागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरुंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली आज तिथे त्याच्या एकदम उलट चालले आहे", असे म्हणत पवार यांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव