ANI
राष्ट्रीय

मणिपूरमध्ये बंडखोरांच्या गोळीबारात ‘सीआरपीएफ’चा जवान शहीद

मणिपूरच्या जिरीबम जिल्ह्यातील मोंगबंग गावात रविवारी सकाळी संशयित बंडखोरांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला.

Swapnil S

इम्फाळ : मणिपूरच्या जिरीबम जिल्ह्यातील मोंगबंग गावात रविवारी सकाळी संशयित बंडखोरांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला.

हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाचे नाव अजयकुमार झा (४३) असे असून, तो बिहारचा आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. संशयित कुकी बंडखोरांच्या सशस्त्र गटाने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर मोंगबंग येथे अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली आहे. बंडखोरांच्या हल्ल्यात सुरक्षारक्षकांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी