Photo : X
राष्ट्रीय

CRPF चे वाहन दरीत कोसळून ३ जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणारे एक वाहन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जवान जखमी झाले आहेत.

Swapnil S

उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणारे एक वाहन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

दरम्यान, स्थानिकांनी व पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १८७ व्या बटालियनची बस उधमपूर जिल्ह्यातील कदवा येथील बसंत गढाचा घाट चढत असताना २०० फूट खोल दरीत कोसळली. सर्व जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उधमपूरमधील भारतीय लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात; शालेय परीक्षा एप्रिल अखेरीसच; राज्याचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर