संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

केजरीवालांच्या जामिनाला ‘ईडी’चे आव्हान; ७ ऑगस्ट रोजी सुनावणी

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी मिळालेल्या जामिनाला आव्हान देणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर ७ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचे सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने निश्चित केले आहे.

केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयाने २० जून रोजी याप्रकरणी जामीन मंजूर केला होता, त्याला यापूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ईडीने त्यांच्या याचिकेची प्रत आम्हाला रविवारी रात्री उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यावर उत्तर देण्यासाठी आम्हाला मुदत द्यावी, असे केजरीवाल यांच्या वकिलांनी न्या. नीना बन्सल कृष्णा यांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला, त्याची प्रत आम्ही सदर करू. ईडीच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी आम्हाला १५ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी वकिलांनी केली. त्यानंतर याप्रकरणी ७ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मुक्रर केले.

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ

मद्य धोरण घोटाळा भ्रष्टाचारप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी न्यायालयाने २२ जुलैपर्यंत वाढ केली आहे. सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ दिली.

केजरीवालांचे २ किलो वजन घटले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कारागृहात ८.५ किलो वजन घटल्याचा दावा आपने केला, मात्र केजरीवाल यांचे केवळ २ किलो वजन घटल्याचे सोमवारी तिहार कारागृहातील सूत्रांनी सांगितले. ‘एम्स’च्या वैद्यकीय मंडळाकडून केजरीवाल यांची नियमित तपासणी केली जात असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. कारागृह प्रशासनाने दिल्ली सरकारच्या गृह मंत्रालयाला आपचे नेते आणि पक्षाने केलेल्या आरोपांबाबत लिहिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असल्याने संभ्रम निर्माण होऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे. केजरीवाल यांचे वजन घटले असल्याचे अखेर तिहार अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, असे आपचे नेते संजय सिंह यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांना कारागृहातच डांबून भाजप त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचविण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप रविवारी आपने केला होता.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था