वर्क फ्रॉम होम लागू करा, दिल्लीत कंपन्यांना सल्ला 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

वर्क फ्रॉम होम लागू करा, दिल्लीत कंपन्यांना सल्ला

दिल्ली सरकारने रविवारी खासगी कंपन्यांना आठवड्यातून किमान दोन दिवस वर्क फ्रॉम होम धोरण लागू करण्याचा सल्ला दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने रविवारी खासगी कंपन्यांना आठवड्यातून किमान दोन दिवस वर्क फ्रॉम होम धोरण लागू करण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलणे, कर्मचाऱ्यांनी कार पूलिंग किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे कामगार विभागाने मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

आयटी आणि व्यावसायिक आस्थापनांसह सर्व खासगी क्षेत्रांना हा नियम लागू राहील. मात्र, रुग्णालय, पाणी आणि वीज यांसारख्या अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या खासगी संस्थांना या सल्लागार सूचनेतून वगळण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच दोन दिवस घरातून काम बंधनकारक करण्यात आले आहे.

खासगी कंपन्यांनी प्रत्यक्ष बैठका ऑनलाइन घ्याव्यात आणि पेट्रोल, डिझेल व सीएनजीचा वापर कमी करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दैनंदिन इंधन वापरामध्ये कार्यालयातील प्रवास हा मोठा घटक असल्याने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.

काटकसर करा! सरकारी बँका, विमा कंपन्यांना अर्थ मंत्रालयाचे आदेश

Mumbai : समुद्रातील तरंगता कचरा काढणार इलेक्ट्रिक बोट; गेटवे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथे मानवरहित बोट कार्यरत

ठाणे जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार

सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटींचा निधी मंजूर; तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीत निर्णय

कांद्याला तीन हजार हमीभाव द्या! आमदार रोहित पवार यांची मागणी