राष्ट्रीय

दिल्लीत खासदारांसाठी आता नव्या अत्याधुनिक सदनिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत खासदारांसाठी असलेल्या १८४ सदनिकांच्या संकुलाचे उद्घाटन केले. या संकुलांमध्ये खासदारांना अत्याधुनिक घरे मिळणार मिळाल्याने खासदार नागरिकांच्या समस्यांकडे वेळ आणि शक्ती वापरू शकतील, असे मोदी म्हणाले.

कृष्णा, गोदावरी, कोसी, हुगळी या नद्यांची नावे देण्यात आलेल्या, दिल्लीतील बाबा खडकसिंग मार्गावर खासदारांसाठी बांधलेल्या १८४ अत्याधुनिक, बहुमजली सदनिकांच्या संकुलाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. या चार बहुमजली इमारतींमध्ये १८०हून अधिक खासदारांची निवासव्यवस्था होणार आहे.

खासदारांसाठी सध्या जाणवणारी सरकारी निवासस्थानांची कमतरता पूर्णपणे दूर करणे आणि त्यांना आधुनिक, पर्यावरणपूरक निवासस्थाने उपलब्ध करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यानिमित्ताने मोदी यांनी या संकुलात सिंदूर वृक्षाचे रोप लावले, बांधकाम करणाऱ्या श्रमजीवींसोबत संवाद साधला व उपस्थितांना संबोधित केले.

‘कोसी’ या इमारतीच्या नावावरून काही जण त्याचा बिहार निवडणुकीशीही संबंध जोडतील, असा टोला लगावून मोदी म्हणाले, कोट्यवधी लोकांना जीवन देणाऱ्या कृष्णा, गोदावरी, कोसी व हुगळी या भारतातील चार महान नद्यांच्या नावाने उभे राहिलेले हे निवासी संकुल आहे. खासदारांसाठी सरकारी निवासस्थानांची कमतरता असूनही २०१४ पर्यंत दिल्लीत एकही नवीन निवासस्थान बांधले गेले नाही. आम्ही हे काम एक मोहीम म्हणून घेतले व गेल्या ११ वर्षांत सुमारे ३५० खासदार निवासस्थाने बांधली.

येथे सण साजरे करा!

स्वच्छता ही या नव्या इमारतींची ओळख झाली पाहिजे; किंबहुना ही आपली कटिबद्धता असायला हवी, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. केवळ खासदारांची निवासस्थानेच नाहीत, तर हे संपूर्ण संकुल नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर किती चांगले होईल. दिल्लीत निवडून आल्यावर येथे निवासस्थान मिळण्याची खासदारांची अडचण दूर होऊन ते नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी वेळ आणि शक्ती वापरू शकतील, असेही ते म्हणाले. वर्षभरात येणारे सर्व प्रमुख सण खासदारांनी या सदनिकांमध्ये साजरे करावेत, असे आवाहनही मोदी यांनी केले.

Independence Day 2025 : ''अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही''; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदवार्ता! २५.५० लाखांत मिळणार ५०० चौ. फुटांचे घर ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

शिवसेना कुणाची; अखेर तारीख ठरली, सुप्रीम कोर्टात ८ ऑक्टोबरला होणार अंतिम सुनावणी

जे. जे. रुग्णालयात ८३ दिवसांत १०० रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण; गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपचार

सोन्यासारखी घरे विकू नका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन