हेल्मेट, अ‍ॅम्ब्युलन्सवरील GST कमी करण्याची इंटरनॅशनल रोड फेडरेशनची मागणी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

हेल्मेट, अ‍ॅम्ब्युलन्सवरील GST कमी करण्याची इंटरनॅशनल रोड फेडरेशनची मागणी

रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या 'इंटरनॅशनल रोड फेडरेशन' या जागतिक संस्थेने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जीएसटी परिषदेला हेल्मेट, अ‍ॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर लक्षणीयरीत्या कमी करण्याचा किंवा पूर्णपणे माफ करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या 'इंटरनॅशनल रोड फेडरेशन' या जागतिक संस्थेने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जीएसटी परिषदेला हेल्मेट, अ‍ॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर लक्षणीयरीत्या कमी करण्याचा किंवा पूर्णपणे माफ करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात, फेडरेशनचे मानद अध्यक्ष के. के. कपिला यांनी जीएसटी सुसूत्रीकरण आणि लोककल्याणासाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तथापि, अनेक अत्यावश्यक सुरक्षा आणि आरोग्य सेवा उत्पादनांवर अद्यापही उच्च दराने जीएसटी आकारला जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कपिला म्हणाले की, हेल्मेटवर सध्या १८ टक्के जीएसटी आकारला जातो. हेल्मेट हे दुचाकी चालकांसाठी बंधनकारक असलेले सुरक्षा उपकरण आहे आणि भारतीय रस्त्यांवर लोकांचे प्राण वाचवण्यात ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमाणे, अ‍ॅम्ब्युलन्स आणि ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स, मॉनिटर्स, व्हीलचेअर्स, इम्प्लांट्स आणि इतर आपत्कालीन आरोग्य सेवा उपकरणांसारखी साधने आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया