Photo : X (airnewsalerts)
राष्ट्रीय

ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; नऊ विमाने वेगवेगळ्या ठिकाणी उतरवली

बांगलादेशची राजधानी ढाक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहू संकुलात शनिवारी दुपारी भीषण आग लागली. यामुळे परिसरात काळ्या धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विमानतळावरील सर्व विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

Swapnil S

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहू संकुलात शनिवारी दुपारी भीषण आग लागली. यामुळे परिसरात काळ्या धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विमानतळावरील सर्व विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

बांगलादेश नागरी विमान प्राधिकरणाने सांगितले की, हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी २.३० वाजता आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची पथके विमानतळावर पाठवली, असे अग्निशमन सेवचे प्रवक्ते तल्हा बिन झासिम यांनी सांगितले. सध्या ३६ अग्निशमन पथके आग विझवण्याच्या कामात गुंतली आहेत, असे त्यांनी सांगितले.

सर्व विमानांची उड्डाणे आणि लँडिंग पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. आमची सर्व विमाने सुरक्षित आहेत, असे बांगलादेश नागरी विमान प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने सांगितले. ढाक्यात उतरणारी किमान नऊ विमाने चित्तगावमधील अमानत आंतरराष्ट्रीय शाह

विमानतळ आणि ईशान्येकडील सिल्हेटमधील उस्मानी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवली. त्यापैकी आठ विमाने चित्तगावमध्ये आणि एक सिल्हेटमध्ये उतरली.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, कार्गो विभागात साठवलेले रासायनिक पदार्थ असल्याने अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात मोठी अडचण येत होती.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, लष्कर, हवाईदल, नौदल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवानही आग विझवणे आणि बचावकार्यात सहभागी झाले होते. ही आग अतिशय मोठ्या प्रमाणात होती आणि विमानतळ तसेच आजूबाजूचा परिसर दाट धुराने वेढला होता. गुरुवारी चित्तगाव एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोनमधील आठ मजली कारखान्याची इमारत भीषण आगीत खाक झाली होती.

तत्पूर्वी मंगळवारी, ढाक्यातील चार मजली वस्त्रनिर्मिती कारखाना आणि रासायनिक गोदामात लागलेल्या आगीत १६ कामगारांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले होते.

आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

बांगलादेश फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशनचे संचालक नसीरुद्दीन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, 'आम्ही सध्या कार्गोचे नुकसान किती झाले आहे हे तपासत आहोत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भागात आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवांची मालवाहतूक साठवली होती, तो भाग मोठ्या प्रमाणावर जळून गेला आहे. त्या परिसरात एक रासायनिक गोदामदेखील होते आणि तेथेही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती