राष्ट्रीय

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण

वृत्तसंस्था

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद वादप्रकरणी सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. मंगळवारी दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, त्याची रूपरेषा काय असेल, हे मंगळवारी सांगण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण वाराणसी कोर्टाकडे वर्ग केले असून ८ आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू झाली. दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयातील सर्व फायली जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात पोहोचल्या, परंतु अद्याप फायली पाहावयाच्या आहेत. दोन्ही बाजूंनी आपापल्या मागण्या मांडल्या, मात्र न्यायालयाने कोणताही निर्णय न देता सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलली.

याप्रकरणी मंगळवारी अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीची प्रक्रिया काय असेल हे मंगळवारी न्यायालयाला सांगण्यात येणार आहे. याशिवाय पुढील सुनावणीची तारीखही कळवण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने न्यायालयाकडे आयोगाचा अहवाल, व्हिडिओ आणि फोटोंची मागणी केली आहे.

दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोरीला बॅरिकेड करून केवळ पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश दिला. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. गेल्या सुनावणीदरम्यान अजय मिश्रा यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. न्यायाधिशांनी न्यायालयात येणाऱ्यांची पोलिसांना यादी दिली आहे. या यादीच्या आधारे प्रवेश देण्यात आले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश