राष्ट्रीय

सणांपूर्वीच महागाईने सर्वसामान्यांचा खिसा कापला! खाद्य तेल १२ टक्क्याने महाग

गणेशोत्सव संपल्यानंतर आता देशाला वेध लागलेत नवरात्र, दसरा व दिवाळीचे. या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य माणसांच्या उत्साहाला उधाण येते. याच काळात अनेक कंपन्यांचे बोनस होतात. त्यामुळे बाजारात खरेदीला जोर येतो. आता सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच देशात गेल्या ४ दिवसांत महागाईने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : गणेशोत्सव संपल्यानंतर आता देशाला वेध लागलेत नवरात्र, दसरा व दिवाळीचे. या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य माणसांच्या उत्साहाला उधाण येते. याच काळात अनेक कंपन्यांचे बोनस होतात. त्यामुळे बाजारात खरेदीला जोर येतो. आता सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच देशात गेल्या ४ दिवसांत महागाईने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तेलाचे दर १२ टक्क्याने वाढले आहेत. विशेष म्हणजे, खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सणासुदीला घरात गोडधोड व फराळ बनवावा लागतो. त्यामुळे खाद्यपदार्थांवरील खर्च वाढणार आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोपडा यांनी बुधवारी दावा केला होता की, सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होणार नाही. कारण जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळू शकतो.

पण, केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याने देशातील जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली आकडेवारी जाहीर केली आहे. शेंगदाण्याचे तेल चार दिवसांत १८० वरून १८६ रुपये प्रति लिटर, मोहरीचे तेल १४२ वरून १४८ रुपये प्रति लिटर, वनस्पती तेल १२२ वरून १२६ रुपये प्रति लिटर झाले आहे. हे सर्व दर सरकारी असून किरकोळ बाजारात यापेक्षाही अधिक किमती असू शकतात.

ग्राहक खात्याच्या माहितीनुसार, खाद्यतेलांच्या दरात ८ टक्क्याने वाढ झाली. १५ सप्टेंबर रोजी सोयाबीन तेल ११८ रुपये लिटर होते, ते १९ सप्टेंबर रोजी १२६ रुपये लिटर झाले. याच काळात पामतेल १०० रुपयांवरून १०७ रुपये लिटर, तर सूर्यफुलाचे तेल ११९ वरून १२६ रुपये प्रति लिटर झाले आहेत.

दरवाढीवरून खाद्यतेल कंपन्यांची झाडाझडती

खाद्यतेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. केंद्राने खाद्यतेल कंपन्यांकडून दरवाढीबाबत खुलासा मागवला आहे. खाद्यतेलाचे दर स्थिर ठेवण्याचा सल्ला केंद्राने या कंपन्यांना दिला.

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

Mumbai : मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम'

निबंधकांच्या मंजुरीनंतरच जन्म, मृत्यू नोंदणी रद्द; दुरुस्तीसाठी नवे कडक नियम

महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना; समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती

Mumbai : दुसऱ्या टप्प्यात २९४ आस्थापनांना नोटीस; मराठी पाट्या प्रकरणी ९,७९८ आस्थापनांची झाडाझडती