राष्ट्रीय

निवडणूक रोखे योजना : सीतारामन यांच्याविरुद्धच्या चौकशीला कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थगिती

एफआयआरमध्ये सीतारामन यांच्यासह भाजपचे नेते नलीनकुमार कतील यांचेही आरोपी म्हणून नाव आहे, ज्यात निवडणूक रोख्यांच्या नावाखाली खंडणीचा आरोप आहे.

Swapnil S

बंगळुरू : निवडणूक रोखे योजनेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतरांच्या सुरू असलेल्या चौकशीला सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. दरम्यान, वादानंतर सदर निवडणूक रोखे योजना रद्द करण्यात आली आहे.

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये भाजपचे नेते नलीनकुमार कतील यांचेही आरोपी म्हणून नाव आहे, ज्यात निवडणूक रोख्यांच्या नावाखाली खंडणीचा आरोप आहे. त्याला आव्हान देणारी याचिका कतील यांनी केली होती. त्यावर न्या. एम. नागप्रसन्ना यांनी अंतरिम आदेश दिला. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

निवडणूक रोखे योजनेबाबत तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी सीतारामन आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचेही ‘एफआयआर’मध्ये नाव आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’