राष्ट्रीय

लाल बहादूर शास्त्रींच्या नातवानेही काँग्रेसची साथ सोडली, भाजपमध्ये केला प्रवेश

Swapnil S

नवी दिल्ली : भारताला जय जवान जय किसान चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करुन राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचेही सांगितले.

विभाकर शास्त्री हे लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र हरी कृष्ण शास्त्री यांचे पुत्र असून ते माजी खासदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षातून अनेक मोठे नेते गळत आहेत. मंगळवारीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबर्इतील प्रभावी काँग्रेस कुटुंबातील मिलिंद देवरा यांनी आधीच काँग्रेसचा हात सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हात धरला आहे. तसेच बाबा सिद्दिकी, ज्योतिरादित्य सिंदिया, जतीन प्रसाद, प्रियंका चतुर्वेदी, सुश्मिता देव, आरपीएन सिंग, जयवीर शेरगील या प्रभावी नेत्यांनी देखील या आधी काँग्रेसला रामराम केला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस