राष्ट्रीय

शेतकऱ्यांचा १० मार्चला ‘रेल रोको’ ; ६ मार्चला दिल्लीत धडकणार

पंजाब-हरयाणाच्या शंभू-खनौरी सीमेवर ठाण मांडून असलेले आंदोलक शेतकरी ६ मार्चला दिल्लीकडे कूच करणार असून १० मार्चला दुपारी १२ ते ४ या वेळेत ‘रेल रोको’ करणार

Swapnil S

अंबाला : पंजाब-हरयाणाच्या शंभू-खनौरी सीमेवर ठाण मांडून असलेले आंदोलक शेतकरी ६ मार्चला दिल्लीकडे कूच करणार असून १० मार्चला दुपारी १२ ते ४ या वेळेत ‘रेल रोको’ करणार आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. भटिंडा येथे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर व जगजितसिंग दालेवाल यांनी ही घोषणा केली.

हरयाणा-पंजाबमधील शेतकरी खनौरी-शंभू सीमेवरच आंदोलन करतील, तर देशाच्या उर्वरित भागातील शेतकरी ६ मार्चला आपापल्या मार्गाने दिल्लीत पोहोचतील. आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही आंदोलनात ड्रोनचा वापर झालेला नाही. सरकारने ड्रोनचा वापर करून बाहेरून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सरकारने हरयाणा-पंजाबची सीमा पाकिस्तान आणि चीनच्या सीमेसारखी केली आहे. त्या सीमांवर तारा लावलेल्या आहेत, पण सरकारने पंजाब-हरयाणा सीमेवर फक्त भिंती उभ्या केल्या आहेत. भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवरही कायदे आहेत, पण हरयाणा-पंजाब सीमेवर कायदा नाही. केंद्र सरकारने ७० हजार सैन्याचा यासाठी वापर केला, असा आरोप शेतकरी नेते पंढेर यांनी केला आहे.

महाराष्ट्राला केंद्र सरकारची 'व्हॅलेंटाईन' भेट; कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाइन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

'टिपू सुलतान'वरून वादाचा धुरळा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी

आजचे राशिभविष्य, १५ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला 'या' वेळेतच करा जलाभिषेक! रात्रीचे चार प्रहर, पूजेची योग्य वेळ आणि संपूर्ण विधी, जाणून घ्या

Mahashivratri 2026 : हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त शेअर करा खास मराठी शुभेच्छा