साबरमती बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामस्थळी आग @FireRID - Automatic Fire Extinguisher
राष्ट्रीय

साबरमती बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामस्थळी आग

अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या साबरमती बुलेट ट्रेन स्थानकात शनिवारी पहाटे आग लागली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही आग सकाळी ६.३० वाजता लागली असून कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swapnil S

अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या साबरमती बुलेट ट्रेन स्थानकात शनिवारी पहाटे आग लागली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही आग सकाळी ६.३० वाजता लागली असून कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग आटोक्यात आणण्यासाठी १३ अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले आणि आग नियंत्रणात आणण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निवेदनानुसार आग ही बांधकामस्थळी छताच्या शटरिंगच्या एका भागात लागली. प्राथमिक तपासणीनुसार तात्पुरत्या शटरिंगच्या वेल्डिंगमधून ठिणग्या उडाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार वेल्डिंगमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली असावी, असे कंपनीने सांगितले. कंपनीचे अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हे स्थानक ५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग आहे. प्रकल्पांतर्गत गुजरातमध्ये ३५२ किमी आणि महाराष्ट्रात १५६ किमी पट्टा समाविष्ट आहे. एकूण १२ स्थानकांचा समावेश असून ही स्थानके मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती येथे असतील.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव