राष्ट्रीय

मच्छीमार नौकेची पाणबुडीला धडक; यलो गेट पोलीस ठाण्यात नौदलाची तक्रार

गोव्याच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस करंज’ या पाणबुडी व मच्छीमार नौकेची धडक झाली होती. यात दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला होता. तसेच पाणबुडीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी नौदलाने यलो गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ३० नोव्हेंबर रोजी याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

Swapnil S

पूनम अपराज / मुंबई

गोव्याच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस करंज’ या पाणबुडी व मच्छीमार नौकेची धडक झाली होती. यात दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला होता. तसेच पाणबुडीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी नौदलाने यलो गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ३० नोव्हेंबर रोजी याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०२४ रोजी गोव्याच्या समुद्रात ‘आयएनएस करंज’ ही पाणबुडी होती. तिचा वेग ६ सागरी मैल होता. सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास पाणबुडीच्या कर्मचाऱ्यांना ‘एफ. व्ही. मर्थोमा’ मच्छिमारी नौका जवळ येत असल्याचे दिसले. या नौकेने स्वयंचलित ओळख यंत्रणेद्वारे कोणताही संदेश पाठवला नाही. त्यामुळे त्या नौकेचा वेग, स्थळ व दिशा समजली नाही. ‘आयएनएस करंज’चे कार्यकारी अधिकारी कमलप्रीत सिंग यांना सोलार सिस्टीमद्वारे मच्छिमारी नौका जवळ येत असल्याचे दिसले. त्यांनी पाणबुडीचा वेग व दिशा बदलण्याचा प्रयत्न करून धडक टाळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मच्छिमारी नौकेने आपला वेग वाढवला आणि ती ‘आयएनएस करंज’ या पाणबुडीला धडकली. या धडकेत नौका बुडाली. या नौकेत १३ खलाशी होते. त्यापैकी ११ जणांना वाचवण्यात यश मिळाले, तर दोन खलाशांचे मृतदेह सापडले आहेत.

या पाणबुडीचे कमांडर अरुनभ यांनी तत्काळ नौदल मुख्यालयाला या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले व ११ जणांना वाचवण्यात यश मिळाले, तर दोघांचे मृतदेह नंतर सापडले.

पाणबुडीचे १० कोटींचे नुकसान

या धडकेमुळे आयएनएस करंजच्या रडार, कम्युनिकेशन सिस्टीम व पेरिस्कोपचे जवळपास १० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

या मच्छिमारी बोटीच्या तांडेलविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पाणबुडी दिसूनही त्याने मच्छीमार बोटीचा वेग वाढवला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्याच्या कृतीमुळे पाणबुडीचे नुकसान झाले तसेच दोघांचा बळी गेला. याप्रकरणी यलो गेट पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती