राष्ट्रीय

हरयाणामधील अपघातात चार नेपाळी नागरिक ठार

या घटनेत मृत्युमुखी पडलेले चौघेही मूळचे नेपाळचे आहेत.

Swapnil S

चंदीगड : हरयाणातील सोनिपत येथे सायकली आणि स्कूटरवर बसलेल्या नेपाळमधील चार जणांचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाला, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. सोनिपतमधील मामा-भांजा चौकात मध्यरात्री हा अपघात झाला, असे सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्याचे एसएचओ इन्स्पेक्टर रविंदर कुमार यांनी सांगितले. दुचाकीस्वार जखमींपैकी एकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.कारने चार सायकलस्वार आणि एका स्कूटरस्वाराला धडक दिली आणि ते हवेत उडले. या घटनेत मृत्युमुखी पडलेले चौघेही मूळचे नेपाळचे आहेत. पाचही जण सोनिपतमधील एका बँक्वेट हॉलमध्ये काम करत होते आणि मध्यरात्री सोनीपतमध्ये घरी परतत होते. या घटनेत कारचा चालक आणि त्याच्यासोबत असलेले अन्य दोघे जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

खिशाला कात्री! केस कापण्यापासून दाढीपर्यंत सर्व महागले; नवे दर जाणून घ्या

Navi Mumbai : "कित्येक रात्री झोपलेच नाही" म्हणत महिलेचा उद्रेक; रात्रीच्या वीजखंडितीने नागरिक त्रस्त, Video

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

MPSC च्या गुणवंताना खासगी नोकरीची संधी; UPSC च्या धर्तीवर निर्णय