Fuel Price Hike : दिल्लीत CNGच्या दरात किलोमागे २ रुपयांची वाढ (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

Fuel Price Hike : दिल्लीत CNGच्या दरात किलोमागे २ रुपयांची वाढ

वाढत्या उत्पादन खर्चामुळे राजधानी दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये मंगळवारी सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : वाढत्या उत्पादन खर्चामुळे राजधानी दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये मंगळवारी सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत झालेली ही तिसरी दरवाढ आहे. तथापि, घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या (PNG) दरात कोणतीही बदल करण्यात आलेला नाही.

दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये वाहनांसाठी सीएनजी आणि घराघरांमध्ये व उद्योगांमध्ये पाईप गॅस पुरवठा करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी 'इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड'ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रति किलो ८१.०९ रुपयांवरून ८३.०९ रुपये झाला आहे.

दिल्लीत पीएनजीचे दर प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर ४९.५९ रुपये यावर स्थिर आहेत. तर मुंबईत पीएनजीचा दर ५१.५० रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर इतका आहे. या वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे खाजगी वाहनचालक, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही प्रति किलोमीटर खर्चाचा विचार करता पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी अजूनही स्वस्त पर्याय आहे.

५ रुपयांची वाढ

१५ मे पासून झालेली ही तिसरी दरवाढ असून, यामुळे सीएनजीच्या दरात एकूण ५ रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी २३ मे रोजी सीएनजीचे दर प्रति किलो १ रुपयाने, तर १५ मे रोजी २ रुपयांनी वाढले होते. दरम्यान, मुंबईत सीएनजीचे दर १४ मे रोजी सुधारित करण्यात आले होते, जेथे सध्या सीएनजीचा दर ८४ रुपये प्रति किलो आहे.

पेट्रोलच्या काळाबाजाराचा मुख्यमंत्र्यांना संशय

राज्यात पेट्रोलची सरासरी मागणी २३ टक्क्यांनी तर डिझेलची मागणी तर ५२ टक्क्यांनी वाढली आहे. अकोला येथे  १५४ टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. तरीही टंचाईसदृश स्थिती तयार होते आहे. त्यामुळे इंधन साठेबाजी होत असल्याचा दाट संशय असून इंधन साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा आणि गृह विभागाला देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.सध्या राज्याच्या काही भागात इंधन टंचाई असल्याचे जाणवत आहे. पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात इंधन साठेबाजी होत असल्याची शंका व्यक्त केली.  राज्यात सरासरीपेक्षा पेट्रोल,  डिझेलची मागणी प्रचंड मोठ्या  प्रमाणात वाढली असली तरी त्याची पूर्तता आपण करत आहोत. पण साठेबाजी होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे फडणवीस म्हणाले.शेतकऱ्यांना  डिझेल मिळावे याचा प्रयत्न करत आहोत. मात्र,  याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. व्यावसायिक वापराचे  पेट्रोल,  डिझेलची मागणी कमी होताना दिसत आहे. सर्वसाधारण मागणीचे इंधन व्यावसायिक वापराकडे वळविण्यात येत आहे का याची चौकशी करत आहोत,  असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साठेबाजांवर कारवाईसाठी संयुक्त पथक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली साठेबाजी केली जात आहे, त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसेच  गृह विभागाकडून  संयुक्त पथकाची निर्मिती केली जाणार आहे.  या पथकाला  जे साठेबाज सापडतील,  त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना इंधन मिळत नसल्याचा मुद्दा आज मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी अन्न आणि  नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हानिहाय पेट्रोल, डिझेल, सीएनजी पुरवठ्याचे आकडे सादर केले.

Mumbai : रेल्वे स्टॉलवरचे खाणे महागणार; वडापाव, समोसा आता २० रुपये, १ जूनपासून दरवाढ लागू

‘आंबा कॅनिंग’ला युद्धाचा फटका; दर कोसळले, परदेशातील मागणी घटली, बागायतदारांचे दुहेरी नुकसान

Mumbai : मेट्रो-६ प्रकल्पाचा खर्च ४४१ कोटींनी वाढला; RTI मधून धक्कादायक माहिती झाली उघड

सावंतवाडी स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कांदा दराचा प्रश्न पेटला; मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार निदर्शने; आज दिल्लीत बैठक