FPJ
राष्ट्रीय

मोदी निवृत्त झाल्यास गडकरी यांनी पंतप्रधान बनावे; काँग्रेस नेत्याची इच्छा

जर पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ व्या वर्षी निवृत्त झाले तर, त्यांच्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान बनवावे, अशी इच्छा कर्नाटकातील काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी व्यक्त केली आहे.

Swapnil S

बेंगळुरू : जर पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ व्या वर्षी निवृत्त झाले तर, त्यांच्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान बनवावे, अशी इच्छा कर्नाटकातील काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी व्यक्त केली आहे.

गोपालकृष्ण म्हणाले की, गडकरींनी देशातील रस्ते आणि महामार्गांच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे आणि ते सामान्य लोकांशी पाठीशी उभे आहेत. म्हणूनच ते पंतप्रधान होण्याच पात्र आहेत. गडकरी सामान्य माणसासोबत आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी चांगले काम केले आहे, लोक त्यांची सेवा आणि त्यांचा स्वभाव जाणतात, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाच्या ७५व्या वर्षी निवृत्तीबाबत मोठं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीशी जोडलं जात होतं. राजकीय वर्तुळात अशी चर्चाही सुरू झाली की, पंतप्रधान मोदी वयाच्या ७५व्या वर्षी निवृत्ती घेणार आहेत. शिवाय, याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या एका नेत्याचं मोठं विधान समोर आलं आहे आणि ज्याची सध्या चर्चाही सुरू झाली आहे.

मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित मोरोपंत पिंगळे: द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना सरसंघचालक भागवत यांनी मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीच्या शालीबाबत केलेल्या वक्तव्याची एक आठवण सांगितली, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास