राष्ट्रीय

देशातील हिंदू मंदिरांबाबत गडकरींचे मोठे विधान; म्हणाले...

नवशक्ती Web Desk

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या बिंदास शैलीमुळं सर्वत्र ओळखले जातात. गडकरी कोणत्याही मुद्यावर अगदी दिलखुलासपणे बोलतात. आता त्यांनी देशातील हिंदूंच्या प्रार्थना स्थळांबद्दल आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. हिंदू मंदीरांमध्ये स्वच्छतेचं पालन केलं जात नसल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

एका कार्यक्रमात बोलतना त्यांनी म्हटलं की, "आपला देश असा आहे की, ज्यात हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते. देशात धर्मशाळा चांगल्या नाहीत. परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद, चर्च यांचं वातावरण पाहून मला वाटलं की आपली देखील प्रार्थनास्थळं चांगली असावीत. मला याबाबत काही करण्याची संधी मिळाली तेव्हा मी महाराष्ट्रात 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग बांधला" असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

तसंच एका मीडिया रिपोर्ट्सनुसार गडकरी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागड येथून निघणाऱ्या कैलास मानसरोवरच्या मार्गाचं 80 ते 85 टक्के काम पुर्ण झाल्याचं देखील सांगितलं. पूर्वी यासाठी नेपाळमधून जावं लागायचं यावेळी असलेल्या उणे तापमाणाचा प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागायचा. तसंच गडकरींनी प्रकल्पांना होणाऱ्या विलंब आणि लागणाऱ्या खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल अचूक बनवण्याची गरज असण्याचं देखील यावेळी सांगितलं.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत