राष्ट्रीय

गगनयानचे ९० टक्के काम पूर्ण; इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती

व्ही. नारायणन 'गगनयान' मोहिमेची माहिती देताना म्हणाले की, रॉकेटची मानवी रेटिंग प्रक्रिया, ऑर्बिटल मॉड्यूलची रचना आणि 'गगनयान' साठी पर्यावरण नियंत्रण प्रणाली जवळ जवळ पूर्ण झाली आहे.

Swapnil S

बंगळुरू : संशोधन भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) दिवाळीच्या धामधुमीत एक आनंदाची बातमी दिली आहे. भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'गगनयान'चे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, असे इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले. 'गगनयान'चे केवळ १० टक्के काम शिल्लक असून ही मोहीम २०२७ च्या सुरुवातीला लाँच केली जाईल, असेही ते म्हणाले. सध्या या मोहिमेच्या सर्व तांत्रिक चाचण्या वेळापत्रकानुसार केल्या जात आहेत.

व्ही. नारायणन 'गगनयान' मोहिमेची माहिती देताना म्हणाले की, रॉकेटची मानवी रेटिंग प्रक्रिया, ऑर्बिटल मॉड्यूलची रचना आणि 'गगनयान' साठी पर्यावरण नियंत्रण प्रणाली जवळ जवळ पूर्ण झाली आहे. हे एक अभियान आहे आणि त्यासाठी अनेक जटिल तंत्रज्ञान विकसित करावे लागले. तीन क्रूशिवाय मोहिमा पूर्ण करायच्या आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतरच अंतराळवीर पाठवले जातील.

'व्योमित्र' रोबोट

पहिल्या क्रूशिवाय मोहिमेत 'व्योमित्र' नावाचा एक मानवीय रोबोट असेल. आम्ही २०२७ च्या सुरुवातीला मानवासह मोहीम सुरू करण्याचे ध्येय ठेवत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले. 'इस्रो'ने काही महिन्यांपूर्वीच पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली. ही चाचणी 'गगनयान' मोहिमेसाठी डिझाइन केलेल्या पॅराशूट सिस्टमची वास्तविक परिस्थितीत पडताळणी करण्यासाठी घेण्यात आली. 'गगनयान' मोहिमेपूर्वी पॅराशूट तैनात करण्याची प्रक्रिया पडताळणे हा यामागील उद्देश होता.

दोन उपग्रह

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षाच्या अखेरपर्यंत दोन उपग्रह लाँच केले जाणार आहेत. पुढील महिन्यात 'एलव्हीएम-३ नोव्हेंबरमध्ये एम५ केले जाईल. नासा-इस्रोच्या संयुक्त मिशन अंतर्गत 'सीएमएस-०३' (जीसॅट-७आर) उपग्रह लाँच करण्यात येणार आहे. यानंतर अमेरिकी कंपनीचे ६.५ टन वजनी संचार उपग्रह 'ब्लूबर्ड-६' लाँच केले जाईल. नासा-इस्रोच्या संयुक्त मिशन 'निसार'चे कॅलिब्रेशन सुरू आहे. ते पुढील १०-१५ दिवसांत सक्रिय होईल.

रॉकेट-प्रशिक्षण सुरू

'गगनयान' मोहीम यशस्वी झाल्यानंतर रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा मानवाला अंतराळात पाठवणारा चौथा देश ठरेल. या मोहिमेनंतर अंतराळातून सौर मंडळाच्या इतर पैलूंवर संशोधनाचा मार्ग मोकळा होईल. भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्याच्या प्रकल्पात मदत मिळेल. संशोधन आणि विकास क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, गुंतवणूक वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अंतराळ उद्योगात काम करणाऱ्या इतर देशांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळेल. 'गगनयान' मोहिमेसाठी रॉकेट तयार आहे आणि अंतराळवीरांचे प्रशिक्षणही सुरू आहे.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन