अनमोल बिष्णोई 
राष्ट्रीय

लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याला पोलिसांनी अटक केली आहे. भारत सरकारने अनमोल याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. अनमोलला आता भारतात आणले जाणार आहे.

Swapnil S

कॅलिफोर्निया : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याला पोलिसांनी अटक केली आहे. भारत सरकारने अनमोल याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. अनमोलला आता भारतात आणले जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनमोल बिष्णोईची प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. ‘एनसीपी’चे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्या प्रकरणात अनमोल हा फरार आरोपी आहे. अनमोल याच्यावर राष्ट्रीय तपास एजन्सीतर्फे दोन गुन्ह्यांसह १८ गुन्हे दाखल आहेत. अनमोल याच्याबाबत माहिती देणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा ‘एनआयए’ने केली होती. अनमोलने आपला भाऊ लॉरेन्सच्या सहाय्याने गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला. अनमोल ७ ऑक्टोबर २०२१ रोजी जामिनावर सुटला होता. २०२३ मध्ये ‘एनआयए’ने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. पण, बनावट पासपोर्टच्या आधारे तो भारतातून फरार झाला.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती