राष्ट्रीय

धक्कादायक! बॉयफ्रेंडने व्हिडिओ कॉल आणि मेसेजला उत्तर दिले नाही, IT च्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले

ती प्रियकराला वारंवार फोन आणि व्हिडिओ कॉल करत होती पण मित्र फोन उचलत नव्हता. यानंतर तिने भावनिक मेसेजही पाठवला पण...

Swapnil S

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अंशू (20 वर्षे) असे विद्यार्थिनीचे नाव असून ती आयटीच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. प्रियकर फोन उचलत नसल्याने विद्यार्थिनी चिडली होती, असे सांगितले जात आहे. यामुळे तिने बुधवारी रात्री पंख्याला लटकून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.

कॉल डिटेल्स आणि सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनी तिच्या प्रियकराला वारंवार व्हिडिओ कॉल करत होती. मात्र तो कॉल रिसिव्ह करत नव्हता. प्रियकरासोबत झालेल्या वादातून विद्यार्थिनीने गळफास लावून घेतला.

सुसाईड नोट सापडली -

पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत आयटीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थीनी होती. ती तिच्या मित्राला वारंवार फोन आणि व्हिडिओ कॉल करत होती पण मित्र फोन उचलत नव्हता. यानंतर तिने भावनिक मेसेजही पाठवला पण मित्राकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिने वसतिगृहाच्या खोलीतच आत्महत्या केली. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त केला आहे. याशिवाय विद्यार्थिनीने आत्महत्या केलेल्या वसतिगृहाची खोलीही सील करण्यात आली आहे.

धक्का देऊन उघडला दरवाजा -

मृत तरुणी मूळ कानपूर शहरातील रहिवासी होती. ती बलिया येथील शासकीय महिला पॉलिटेक्निकच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी सांगितले की, जेव्हा विद्यार्थिनी जेवण करून मेसमधून परतल्या तेव्हा त्यांना त्यांच्या एका वर्गमैत्रिणीचा दरवाजा बंद दिसला. यावर त्यांनी बाहेरून फोन केला मात्र प्रतिसाद आला नाही. विद्यार्थिनींनी धक्का देऊन दरवाजा उघडला आणि अंशूला लटकलेले पाहून त्यांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. लगेच मुख्याध्यापक व इतर शिक्षकही तेथे आले. त्यानंतर स्थानिक पोलिस स्टेशनला कळवण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थिनीचा मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश