राष्ट्रीय

७०० रु.ने वाढून सोने विक्रमी ७३,७५० रुपयांवर

मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल लक्षात घेऊन सलग दुसऱ्या दिवशी वाढ होऊन सोन्या-चांदीच्या किमतींनी मंगळवारी नव्या सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठली.

Swapnil S

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल लक्षात घेऊन सलग दुसऱ्या दिवशी वाढ होऊन सोन्या-चांदीच्या किमतींनी मंगळवारी नव्या सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमती ७०० रुपयांनी वाढून ७३,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचल्या. सोमवारी तो ७३,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीच्या भावाने ८०० रुपयांची उसळी घेत प्रति किलो ८६,५०० रुपयांचा उच्चांक गाठला.

दिल्लीच्या बाजारात स्पॉट सोन्याच्या किमती (२४ कॅरेट) ७३,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला. विदेशी बाजारातील संकेतामुळे त्यात ७०० रुपयांनी वाढ झाली, असे सौमिल गांधी, वरिष्ठ विश्लेषक, एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज, म्हणाले. जागतिक बाजारात, कॉमेक्स येथे स्पॉट गोल्ड मागील बंदच्या तुलनेत १५ अमेरिकन डॉलरने वाढून २,३७० डॉलर प्रति औंसवर होते.

इराणने गेल्या आठवड्यात इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याच्या भीतीने सुरक्षित मालमत्तेची मागणी वाढल्याने सोने वधारले. गुंतवणूकदारांचे लक्ष संभाव्य प्रतिहल्ल्याकडे वळले असून दोन देशांमधील युद्ध सुरू होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मौल्यवान धातूच्या किमतींमध्ये गुंतवणूक वाढली आहे, असे गांधी म्हणाले. चांदीही प्रति औंस २८.४० डॉलरवर पोहोचली. मागील बंदमध्ये, तो प्रति औंस २८.२५ अमेरिकन डॉलरवर होता.

दरम्यान, एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडमध्ये, सोन्याचा सर्वात जास्त व्यवहार झालेला जून करार ३४९ रुपयांनी किंवा ०.४८ टक्क्यांनी वाढून ७२,६२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. दिवसभरात तो ७२,९२७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या दिवसभरातील उच्चांकावर पोहोचला. याशिवाय, मौल्यवान धातूचा ऑगस्ट डिलिव्हरीचा करार ७२,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होता. तथापि, मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) वर चांदीचा मे करार ३१४ रुपये किंवा ०.३७ टक्क्यांनी घसरून ८३,५३७ रुपये प्रति किलो झाला.

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

जरांगेंचा धमाका; ५०० कोटींच्या दाव्याची ऑडिओ क्लिप जारी, कट-कारस्थान रचल्याचा शिंदेसेनेचा आरोप

निदर्शने, आंदोलने कामाची नाहीत; राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शहा यांची टीका

Mumbai : ‘बेस्ट’ची टेम्पोला धडक; एकाचा मृत्यू, मजास डेपो परिसरातील घटना, बसचालकाविरुद्ध गुन्हा