सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता; दीर्घकालीन दरवाढीबाबत सराफ कंपन्यांना आशावाद 
राष्ट्रीय

सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता; दीर्घकालीन दरवाढीबाबत सराफ कंपन्यांना आशावाद

भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमती चढ्या आणि अस्थिर (चढ-उतारांच्या) राहण्याची शक्यता आहे, असे टायटनने म्हटले आहे. मात्र, अनुकूल लोकसंख्याशास्त्र आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असलेले आकर्षण यांमुळे ज्वेलरी बाजाराच्या दीर्घकालीन वाढीच्या शक्यतांबद्दल कंपनीने आशावाद व्यक्त केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमती चढ्या आणि अस्थिर (चढ-उतारांच्या) राहण्याची शक्यता आहे, असे टायटनने म्हटले आहे. मात्र, अनुकूल लोकसंख्याशास्त्र आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असलेले आकर्षण यांमुळे ज्वेलरी बाजाराच्या दीर्घकालीन वाढीच्या शक्यतांबद्दल कंपनीने आशावाद व्यक्त केला आहे.

या आव्हानांनंतरही, अनुकूल लोकसंख्याशास्त्र आणि मूल्य साठवण्याचे साधन (स्टोअर ऑफ व्हॅल्यू) म्हणून दागिन्यांचे असलेले सातत्यपूर्ण महत्त्व यामुळे भारतातील भविष्य सकारात्मक आहे; तथापि, अल्पकालीन मागणीतील चढ-उतार कायम राहू शकतात, असे टायटनने वार्षिक अहवालात म्हटले आहे.

टाटा आणि तमिळनाडू सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या टायटनने म्हटले आहे की, चालू असलेल्या भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक संघर्षांमुळे निर्माण झालेल्या समष्टी आर्थिक अनिश्चितता पाहता सोन्याचे दर चढे आणि अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

टाटा समूहाद्वारे व्यवस्थापित असलेल्या या कंपनीने असेही म्हटले आहे की, भू-राजकीय घडामोडींमुळे निर्माण होणाऱ्या या समष्टी आर्थिक अनिश्चिततेमुळे विविध ग्राहक घटकांमध्ये मागणीच्या स्वरूपात बदल होऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. मागणीच्या घटकांमध्ये बदल होऊ शकतात आणि विभाग रिटेल विस्तार, उत्पादन नावीन्यता (प्रॉडक्ट इनोव्हेशन), ग्राहक प्रतिबद्धता, नवीन कलेक्शन, उत्पादन उत्कृष्टता (मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स) आणि ब्रँड बिल्डिंगमधील सातत्यपूर्ण गुंतवणुकीच्या जोरावर बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्याला आणि महसूलवाढीला प्राधान्य देणे सुरूच ठेवेल, असे टायटनने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७५,००० कोटी रुपयांच्या महसुलाचा टप्पा ओलांडणाऱ्या कंपनीने - ज्यामध्ये तिच्या ज्वेलरी विभागाचा वाटा ९१.५ टक्के होता- संघटित ज्वेलरी क्षेत्रातील दीर्घकालीन संधींचा लाभ घेण्यासाठी रिटेल नेटवर्कचा विस्तार करण्यावर आणि ग्राहकांचा अनुभव अधिक करण्यावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

टाटा समूहाच्या कंपनीसाठी आर्थिक वर्ष २०२६ हे एक ऐतिहासिक वर्ष होते. जागतिक व्यापार अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि सोन्याच्या अस्थिर किमती अशा आव्हानांचा सामना करूनही कंपनीने ७५,००० कोटी रुपयांच्या महसुलाचा टप्पा ओलांडला. याचा ज्वेलरी व्यवसायातील ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता.
अजय चावला, व्यवस्थापकीय संचालक, टायटन कंपनी

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

Mumbai : नरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू; प्रकल्प १७ वर्षांनंतर पुनरुज्जीवित

Mumbai : दोन दिवसांत १६ हजार मॅनहोल्सची तपासणी

कारवाईचा बडगा, १२ अधिकारी तडकाफडकी निलंबित; नादुरुस्त एसटी बस १५ दिवस पडून, लाखोंचे नुकसान

आज-उद्या रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडात मुसळधार पावसाचा इशारा