राष्ट्रीय

दिवाळीपूर्वी दिल्लीत सोने -चांदी स्वस्त

राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सोन्याचा भाव ४३५ रुपयांनी घसरून ४९,२८२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला

वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर घसरत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव आणि आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी स्वस्त झाल्याने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. सणासुदीच्या काळात किमती कमी असल्याने दागिन्यांची मागणी वाढू शकते. मात्र, सोन्या-चांदीच्या सध्याच्या किमती गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. प्रत्यक्षात ही किंमत सप्टेंबर २०२०मधील दराच्या तुलनेत खूप कमी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरल्याने राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सोन्याचा भाव ४३५ रुपयांनी घसरून ४९,२८२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. मागील व्यवहारात, सोने ४९,७१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​स्थिरावले होते. तर चांदीचा भावही १६०० रुपयांनी घसरून ५४,७६५ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १६१५.७ डॉलर प्रति औंस होता, तर चांदीचा भाव १८ डॉलर प्रति औंस वर घसरला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, गुंतवणूकदार जोखीम घेण्यापासून दूर राहत असल्याने दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४३५रुपये प्रति १० ग्रॅमने कमी झाली.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली