प्रातिनिधिक छायाचित्र 
राष्ट्रीय

भक्तांसाठी खुशखबर : वैष्णोदेवीला रोपवे होणार; श्री माता वैष्णोदेवी मंडळाचा निर्णय

देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. वैष्णादेवीला जाण्यासाठी अत्यंत खडतर मार्ग पार करावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिक व शारीरिकदृष्ट्या अपंगांना वैष्णादेवीला जाताना अनेक यातना भोगाव्या लागतात.

Swapnil S

जम्मू : देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. वैष्णादेवीला जाण्यासाठी अत्यंत खडतर मार्ग पार करावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिक व शारीरिकदृष्ट्या अपंगांना वैष्णादेवीला जाताना अनेक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे वैष्णोदेवीला जाण्यासाठी रोपवे उभारण्यास श्री माता वैष्णोदेवी मंडळाने मंजुरी दिली आहे. वैष्णोदेवीला रोपवे उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. रोपवे पूर्ण झाल्यानंतर लाखो भाविकांची सोय होऊ शकेल. त्यातून आणखी कोट्यवधी भाविक दर्शनाला येऊ शकतील.

माता वैष्णोदेवी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशूल गर्ग म्हणाले की, रोपवे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

हा प्रकल्प राबवताना स्थानिकांच्या अडचणींचा विचार केला जाणार आहे. रोपवे प्रकल्प गेमचेंजर ठरणार असून त्यामुळे शारीरिक अडचणी असलेल्या भाविकांना १३ किमीचा अवघड मार्ग सहजपणे पार करता येणार आहे. रोपवे झाल्यानंतर भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकेल, असे गर्ग म्हणाले.

माता वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.२०२३ मध्ये वैष्णोदेवीला ९५ लाख भाविकांनी भेट दिली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून रोपवे प्रकल्पाची चर्चा होत होती. आता हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीत येत आहे. या प्रकल्पाचा मोठा फायदा ज्येष्ठ भाविकांना होईल. कारण वयामुळे त्यांना हा मार्ग पार करणे शक्य नसते. तसेच हेलिकॉप्टर सेवाही मर्यादित असते, असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांच्या हितांचे संरक्षण केले जाणार आहे. कारण हे स्थानिक नागरिक भाविकांना घोडे, पालखीतून नेत असतात. या प्रकल्पामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. मंडळाने या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केल्याने या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

भाविकांचा प्रवास होणार सोईस्कर

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा रोपवे तराकोटे मार्ग ते भवन (देवीचे मंदिर) या मार्गावर उभारला जाईल. पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेतली जाणार आहे. रोपवेमुळे त्रिकुटा टेकडीचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. या रोपवेमुळे रोज हजारो भाविकांची वाहतूक होईल. त्यातून मार्गिकेवरील गर्दी कमी होण्यास मदत मिळेल, तसेच भाविकांचा प्रवास सोईस्कर होईल. रोपवेमुळे अवघ्या काही मिनिटांत भाविकांना वैष्णोदेवी मंदिर गाठता येऊ शकेल.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे