राष्ट्रीय

गुगल, फेसबुकसह ७० डिजिटल कंपन्यांना जीएसटीच्या नोटिसा

प्रतिनिधी

मुंबई : फेसबुक, गुगल, नेटफ्लिक्स, स्पोटीफाय या नामांकित कंपन्यांसह ७० डिजिटल कंपन्यांना जीएसटी प्राधिकरणाने नोटिसा बजावल्या आहेत. यात काही जाहिरात कंपन्या, एडटेक व ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचाही समावेश आहे. भारतीय ग्राहकांसाठी १ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या सर्व परदेशी सबस्क्रिप्शन आधारित सेवा प्रदात्यांसाठी नवीन जीएसटी नियमांना कर अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी जीएसटी कायद्यांतर्गत, थेट किंवा भारतीय प्रतिनिधींमार्फत एक सोपी नोंदणी प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.

भारतीय अधिकार क्षेत्राबाहेरील परदेशी ऑनलाईन माहिती डेटाबेस प्रवेश आणि पुनर्प्राप्ती सेवा प्रदात्यांना फॉरवर्ड शुल्काच्या आधारावर १८ टक्के आयजीएसटी भरावा लागतो. जेथे सेवा प्रदाता प्राप्तकर्त्याकडून कर गोळा करण्यासाठी आणि तो सरकारला पाठवण्यासाठी जबाबदार असतो. या सेवेत जाहिरात, क्लाऊड सेवा, ई-बुक, चित्रपट, संगीत, सॉफ्टवेअर, डाटा व इन्फॉर्मेशन, डेटा स्टोरेज, ऑनलाईन गेमिंग आदींचा समावेश होतो.

परदेशी सबस्क्रिप्शनवर काम करणाऱ्या कंपन्या व सोशल मीडिया कंपन्या भारतीय सबस्क्रायबरकडून मोठा महसूल गोळा करतात. ऑनलाईन शिक्षण सेवा कंपन्या, गेमिंग व जाहिरात आदींनाही जीएसटी लागू होता, असे वरिष्ठ कर अधिकाऱ्याने सांगितले. जीएसटी अधिकाऱ्यांना अनेक ऑनलाईन गेमिंग आणि जाहिरात कंपन्या करचुकवेगिरी करत असल्याचा संशय आहे. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात सरकारला २ हजार कोटी रुपये महसुलाची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी या क्षेत्रातून सरकारला ७०० कोटी रुपये महसूल मिळाला होता. अनेक परदेशी कंपन्या भारतात विविध डिजिटल सेवा देत आहेत.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा